दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे......
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे.....
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती....
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती.....
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती....
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी.......
Created by: Prakash Yamgar
रक्षाबंधन. . .
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली. . .